3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

तपासामध्ये पोलीसांकडून झालेला हलगर्जीपणा गंभीर – महसूलमंत्री विखे पाटील  साकुर येथील पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-अत्याचारानंतर पिडीत मुलीच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.या घटनेतील आरोपीना अटक झाली असली तरी तपासामध्ये पोलीसांकडून झालेला हलगर्जीपणा गंभीर आहे.फिर्याद घेण्यासाठी उशिरा पर्यत बसून ठेवणार्या ठाणे अंमलदारासह या आरोपींना राजकीय पाठबळ देणार्या सर्वाचे काॅल रेकाॅर्ड तपासण्याची गरज असल्याचे मत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

साकूर येथे इयता दहावीतील विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली.त्यानंतर या मुलीने आत्महत्या केली.या गंभीर घटनेनंतर सामाजिक वातावरण गंभीर झाले.या पार्श्वभूमीवर पालक मंत्री विखे पाटील यांनी मुलीच्या कुटूबियाची भेट घेवून दिलासा दिला.तसेच घडलेल्या घटनेची सर्व माहीती जाणून घेतली .मुलीच्या आई वडील तसेच नातेबाईकांनी पोलीसाकडून झालेला हलगर्जीपणा आणि या भागात असलेली दहशत आणि लागोपाठ घडत असेलेल्या आशा घटनामुळे मुलीना शाळा महाविद्यालयांत पाठवणिण्याचे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाली असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.तपास योग्य दिशेने व्हावा तसेच यातील शेवटचा गुन्हेगार सापडेपर्यत आपण तुमच्या बरोबर आहोत आशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,या गंभीर घटनेचा तपास जलदगती न्यायालयात चालवावा तसेच यासाठी विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार आहोत.प्रचलित नियमाप्रमाणे मुलीच्या कुटूबियांना मदतही मिळेल यामध्ये अचारसंहीतेचा अडसर येणार नाही असेही त्यांनी सांगितले.

या घटनेच्या मुळापर्यत जावून तपास होण्याची अपेक्षा व्यक्त करून फिर्याद द्यायला गेलेल्या पालकांना रात्री उशिरापर्यत बसवून ठेवणे अतिशय गंभीर आहे.त्यामुळे ठाणे अंमलदार कोणे इथपासासून तै आरोपीना कोणाचे फोन आले.ते कोणाच्या संपर्कात होते यासाठी त्यांच्या मोबाईलचे काॅल रेकाॅर्ड तपासण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

या घटनेतील आरोपीकडून यापुर्वी सुध्दा घडलेली घटना समोर आल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधून या आरोपींना राजाश्रय देवून आशी प्रकरण मिटवली जात असतील ही गंभीर बाब असल्याचै विखे पाटील म्हणाले.

या भागात वाळू माफियांनी मांडलेला उच्छादही वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत आहे.आम्ही वाळू माफीयांचा बंदोबस्त करतो याचा काहीना पोटशूळ उठतो.पण या वाळू माफीयांचा बंदोबस्त करणारच असे सांगून या माफीयांनी सुरू केलेल्या सामाजिक दहशतीचेही उच्चाटन समाज करेल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ भाजपयुमोचे सरचिटणीस शैलैश फटांगरे तालुका अध्यक्ष हरीष वलवे अल्पसंख्याक आघाडीचे रौफ शेख सरपंच रविंद्र दातीर बुवाजी खेमनर बाळासाहेब यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!