spot_img
spot_img

राहाता मधील ५० ग्रामपंचायतीत आरोग्य विभागाची ‘शासन आपल्या दारी’ शिबिरे !नागरिकांना मिळणार आरोग्य योजनांचा मोफत लाभ २४ मे ते ३० मे कालावधीत जनजागृती

शिर्डी, दि.२३ मे‌ ( प्रतिनिधी):– राहाता  तालुक्यातील ६ मंडळामधील ५० ग्रामपंचायतीमधील ६१ गावांमध्ये २५ मे २०२३ पासून तालुका आरोग्य विभागाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ शिबिरांच्या आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका व सहाय्यक आरोग्य नागरिका़ना आरोग्य योजनांचा मोफत लाभ देण्यासाठी गावपातळीवर कार्यरत असणार आहेत. अशी माहिती राहाता पंचायत समिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप यांनी दिली आहे‌.  

राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत २५ मे २०२३ पासून रोजी राहाता मधील १० गावांमध्ये आरोग्य शिबिरांना सुरूवात होणार आहे. ३० मे २०२३ पर्यंत या मोहीमेत गावी-गावी शिबिरे घेण्यात येणार आहेत. 
तालुका आरोग्य प्रशासनाने शिबिरांसाठी तयारी केली आहे. २५ मे ते ३० मे कालावधीमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता या वेळेत गावनिहाय ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शिबिरांच्या यशस्वितेसाठी ग्रामस्तरावरील अधिकारी,‌कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा स्वयंसेविका ,आरोग्य सेवक यांच्याकडे आरोग्य विभागाच्या योजनांच्या प्रचार व प्रसिध्दी जबाबदारी देण्यात आली आहे.
ग्राममपंचायतच्या दर्शनी भागात योजनांची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे.शासन आपल्या दारी’ ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजनेत क्षयरोग DBT योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना, आभा कार्ड नोंदणी, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, मानव विकास कार्यक्रम (बुडीत मजूरी), दंत व नेत्र तपासणी शिबीर व प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या योजना मुख्यत: राबविण्यात येणार आहेत‌. असे ही गटविकास अधिकारी श्री.पठारे व तालुका आरोग्य अधिकारी श्री.घोलप यांनी सांगितले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!