राहाता तालुक्यातील कोल्हार येथील शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या सागर याचे वडील पद्मश्री विखे कारखान्यातील शेतकी विभागातून सेवानिवृत्त झालेले आहे.तर आई राधाबाई या गृहिणी आहेत.अतिशय साधारण असलेल्या कुटुंबातील सागर याला एक भाऊ आणि एक बहिण आहे. जीवनात काहीतरी वेगळे करून दाखवायचे या धडपडीतून सागर याने युपीएससी मध्ये यश संपादन केले आहे.
कोल्हार भगवतीपूर येथील सागर यशवंत खर्डे हा विद्यार्थी युपीएससी यशस्वी प्रवरा पब्लीक स्कुलचा माजी विद्यार्थी
लोणी दि.२३( प्रतिनिधी):-प्रवरा परिसरांतील कोल्हार भगवतीपूर येथील सागर यशवंत खर्डे हा विद्यार्थी युपीएससी परीक्षेत ४४५ गुण मिळवत यश संपादन केले.तो लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे.
प्रवरा शैक्षणिक स्कुलामध्ये शिक्षण घेत असतांना काही तरी वेगळे करायचे ही जिद्द ठेऊन त्यांने हे यश संपादन केले. या यशाबद्दल महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील,खा. डाॅ.सुजय विखे पाटील, डाॅ.भास्करराव खर्डे, सचिव भारत घोगरे,अतिराक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे आदी अभिनंदन केले.
ग्रामीण भागात शिक्षण घेऊन मिळालेले यश मोठे आहे.प्रवरेत असलेल्या शैक्षणिक सुविधामुळे हे यश मिळाले.आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करुन शकलो हा आनंद मोठा आहे.सामान्य जनतेला आणि शेतकरी वर्गाला न्याय देण्याचा मानस आहे.ग्रामीण विद्यार्थी हा कमी नसतोच त्यांने जिद्द ठेऊन पुढे जावे.
सागर खर्डे



