मुंबई( प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते , मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीतील ३ पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात तयारी करावी. तिघांच्या मेहनतीने पुन्हा मविआचं सरकार सत्तेत येईल आणि खोके सरकार पळेल, असे सूचक वक्तव्य केले.
तर महाविकास आघाडीमध्ये १६-१६-१६ जागांचा फॉर्म्युला ठरला नसल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलेय. तर लोकसभेला ठाकरे गटाचे१९ खासदार असतील असा पुनरूच्चारही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय. यादरम्यान, जागावाटपासंदर्भातील वाद टाळण्यासाठी काळजी घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.




