या यशवंत स्टडी क्लब मध्ये नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी करत असतात. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये यशवंत स्टडी क्लब च्या पाच विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर यश मिळवले व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत इतरही विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला. तसेच नेवासाचीही मान उंचावली या यशामुळे मला प्रचंड समाधान मिळाले असून तरुणांसाठी ही नक्कीच प्रेरणादायी बाब आहे असे प्रतिपादन मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करण्याची प्रचंड क्षमता : उदयन गडाख यशवंत स्टडी क्लब मध्ये सत्कार समारंभ संपन्न.
नेवासा फाटा( प्रतिनिधी ):-ग्रामीण भागातील तरुणांमध्ये जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करण्याची प्रचंड क्षमता असते. फक्त गरज आहे त्यांना शिक्षणासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याची . मुळा एज्युकेशन सोसायटीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नेवासा येथे यशवंत स्टडी क्लब सुरू केले आहे.
उदयन गडाख पुढे बोलताना म्हणाले की सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पाचही विद्यार्थ्यांनी जिद्द , चिकाटी व संयम राखत कुठल्याही गोष्टीला न डगमगता सामोरे गेले. व कठोर परिश्रमाअंती त्यांना हे यश मिळाले आहे. या स्पर्धा परीक्षेत सर्वांनाच यश मिळते असेही नाही परंतु जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रचंड अभ्यास करून अशक्य वाटा स्पर्धा परीक्षा मार्फत यशस्वी करता आल्या पाहिजे. तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असलेल्या आपल्या इतरही मित्रांना मार्गदर्शन करावे व येत्या काळात यशवंत स्टडी क्लब मध्ये अजूनही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेषतः विद्यार्थिनींनीही मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेत आपला सहभाग नोंदवावा असे उदयन गडाख यांनी सांगितले.
नेवासा शहरात शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन मुलांनी स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या द्याव्यात याकरिता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात येणार आहे असे यशवंत स्टडी क्लबचे समन्वयक महेश मापारी यांनी सांगितले.
यावेळी यशवंत स्टडी क्लब मध्ये
संतोष बर्डे ,महेश निकम, अभिजीत हुसळे, रोहित सुरसे, महेश गव्हाणे ,महेश रोडगे, दीपक पंडुरे या विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल व अहमदशहा शेख याची भूमि अभिलेख लिपिक पदी निवड झाल्याबद्दल तसेच शुभम चरवंडे याची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड झाल्याबद्दल या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रस्ताविक स्टडी क्लबचे समन्वयक महेश मापारी यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक देविदास साळुंके यांनी केले तसेच आभार बाळासाहेब नगरे यांनी मानले.
यावेळी व्यासपीठावर नंदकुमार पाटील ,लक्ष्मण जगताप, सतीश पिंपळे, काकासाहेब गायके,राजू परदेशी,दिलीप शेलार पप्पू परदेशी ,गणेश कोरेकर ,अल्पेश बोरकर, दिनेश व्यवहारे , सचिन नागपुरे , जावेद इनामदार, नारायण लोखंडे , अभय गुगळे,आशिष कावरे
आदी उपस्थित होते.
….
आ शंकरराव गडाख पा यांच्या प्रेरणेने व प्रशांत गडाख अध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरात सुरू करण्यात आलेल्या यशवंत स्टडी क्लब चा अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना फायदा होतो आहे यामुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत
ही बाब प्रेरणादायी आहे.
{उदयन गडाख}
उपाध्यक्ष
मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई.