17.6 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ५ कोटी ६ लाख रुपये नफा

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-  पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन – २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षात रुपये ५ कोटी ६ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे अशी माहिती काशिनाथ दाते सर संस्थेचे संस्थापक, चेअरमन तथा माजी सभापती बांधकाम व कृषी समिती जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिली आहे. संस्थेच्या ठेवी मार्च २०२४ अखेर २११ कोटी २४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे खेळते भाग भांडवल २४७ कोटी ५७ लाख आहे. वसूल भाग भांडवल ६ कोटी ३४ लाख व राखीव व इतर निधी २२ कोटी ४० लाख रुपये आहे. संस्थेचे कर्ज वाटप १७१ कोटी २३ लाख असून बँक शिल्लक व गुंतवणूक रुपये ६३ कोटी ३१ लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये २४६१ कोटींची झालेली आहे. आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये ८ कोटी ३८ लाख व कर्जामध्ये ११ कोटी ८१ लाख वाढ झालेली आहे असे संस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे सर यांनी सांगितले. 

संस्थेने २१ वर्षाच्या कालावधीत सभासदांच्या विश्वासावर प्रगती केलेली असून सभासदांना घरबांधणी, व्यवसाय, स्थावर मालमत्ता खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी तसेच गोरगरीब गरजू घटक, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, लघुउद्योग, होतकरू कामगार यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करता यावी यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेने २१ वर्षाच्या कालावधीत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव व कामोठे (नवी मुंबई), खडकवाडी, आळेफाटा ता. जुन्नर, सुपा व शिरूर येथे स्वमालकीच्या प्रशस्त व अद्यावत इमारती आहेत.

पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, बेलवंडी फाटा, जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा ता. जुन्नर, सुपा, कामोठे (नवी मुंबई), वनकुटे, अहमदनगर, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा १७ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर, पुणे, ठाणे व नवी मुंबई आहे. संस्थेमार्फत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी व जामगाव, ढवळपुरी व बेलवंडी फाटा येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संस्थेच्या अध्यावत कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, एस एम एस सुविधा मुळे ग्राहकांना सर्व माहिती तात्काळ मिळत आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, ग्राहकांना स्वतःच्या क्यू आर कोड ने पैसे स्वीकारण्याची सोय, आर.टी.जी.एस व एन. इ. एफ. टी सुविधा सुरू करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!