लोणी दि.२२( प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवत असताना अभ्यासक्रमातील बाबी प्रत्यक्षरीत्या समजाव्यात. कृषी कर्ज वितरण विषयी आणि बँकेतील विविध विभागातील कार्यपद्धती विषयी माहिती मिळावी याकरिता लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरांतील बॅकामध्ये जावून कृतीशिल शिक्षणांचे धडे घेतले.
कृषि पत पुरवठा विभागाच्या विद्यार्थ्यानी बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, कोल्हार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, लोणी येथील प्रवरा सहकारी बँक आणि आयडीबीआय बँक या बँका निश्चित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले व त्या विद्यार्थ्यांनी वरील बँकांना प्रत्यक्ष भेट देऊन येथील व्यवस्थापन प्रणाली, बँकिंग संदर्भातील विविध घटक, पतपुरवठा तसेच कृषी संबंधित विविध योजना, दिलेल्या कर्जाच्या वसुली संदर्भात बँकांना येणारा अनुभव व तरतुदी याबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कुतूहलाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. या उपक्रमाचा समन्वय प्राचार्य डॉ किरण गोंटे आणि बँकिंग फायनान्स अँड अकाउंटन्सी विभागाचे डॉ अनिल बेंद्रे यांनी केला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी केंद्रित आणि सर्वसमावेशक शिक्षण देणे अभिप्रेत आहे. पाठ्यपुस्तकातून विद्यार्थी जे शिकतात ते त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळाल्यास ते आत्मसात करणे सोपे जाते. हा उद्देश ठेवून लोणी प्रवरेत शिक्षणांवर भर असतो. अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे यांनी दिली.