10.3 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

इनोव्हेशन आणि स्टार्टअप क्षेञात ग्रामीण भागाला मोठी संधी- इस्ञोचे जी.श्रीनिवास राव प्रवरेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात “इन्स्पायर महाराष्ट्र – २०२४ 

लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा):-इनोव्हेशन स्टार्टअप क्षेञात मोठी संधी सध्या उपलब्ध आहे.या माध्यमातून देश सृमध्दपणे उभा राहत असून ग्रामीम भागातील विद्यार्थी हा कोठेही मागे नाही.योग्य करिअर निवडून पुढे जातांना आपल्या भागाची गरज ओळख प्रवरेच्या प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मिडीयम इंटरप्रायजेस (प्रिझम) फोरम अंतर्गत आपल्या पंखात बळ देण्याचे काम आदर्श आहे. शिवाय केंद्र आणि राज्य शासन ही यासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन भारतीय अवकाश संस्था (इस्त्रो) हैदराबाद येथील सह संचालक .जी.श्रीनिवास राव यांनी केले.

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्याा लोणी येथी प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात “इन्स्पायर महाराष्ट्र – २०२४” या तंत्रज्ञान परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यावेळी डाॅ.राव बोलत होते.संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांचे अंतर्गत प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मिडीयम इंटरप्रायजेस (प्रिझम) फोरम ची स्थापना करण्यात आली असून या कंपनी मार्फत “इन्स्पायर महाराष्ट्र – २०२४” या कार्यक्रमाचा शुभारंभ भारतीय अवकाश संस्था (इस्त्रो) हैदराबाद येथील सह संचालक डॉ.जी.श्रीनिवास राव यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय संरक्षण संशोधन संस्थेचे श्री.जितेंद्र जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ.मुकुद शिंदे, माजी विद्यार्थी आणि सी-डॅक इंटरनॅशनलचे सौ.रोहिता आणि श्री.डी.एस.आर.राजू ,दिल्लीचे पोलीस प्रमुख श्रीमती सुमन नलवा!गुंतवणूक व तंत्रज्ञान विषयक सल्लागार डॉ.कृष्णा यार्लीगड्डा, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक श्री.शिवाजीराव जोंधळे,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एस.एन.हिरेमठ,प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने, कार्यक्रम समन्वयक डाॅ.संजय कुरकुटे,डाॅ.चंद्रकांत कडू आदीसह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ.श्रीनिवास राव यानी सेटेलाइटचे शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्वाचे स्थान तसेच सेटेलाइटचे कार्य या याबाबत माहिती देतांनाच ग्रामीण युवकांना यामध्ये मोठी संधी आहे.स्टार्ट इंडीयासाठी सर्वानी एकञित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत लहान मोठ्या समस्या असल्या तरी कठोर परीश्रमातूनटं यश मिळत असते. प्रवरा प्रत्येक गोष्टी पुढे आहे येथील सेवा- सुविधा यातून प्रेरणा घेतांना नवीन संकल्पना कृती आण्यासाठी पुढे यावे असे सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ.शिदे व तंत्रज्ञ सहकारी हे ड्रोनचे प्रात्यक्षिक, शेतीकामासाठी ड्रोनचा उपयोग इ.विषयावर माहिती दिली. या निमित्ताने आयोजित प्रदर्शनास इस्ञो,महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, ई बाईक,नवनवीन संकल्पना आधारीत स्टार्ट हे लक्षवेधी ठरले.

प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मिडीयम इंटरप्रायजेस (प्रिझम) फोरमचे कार्यकारी अधिकारी डाॅ.संजय कुरकुटे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद करत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली.तर प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी प्रिस्ताविकातून महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थी हा उद्योजक व्हावासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहीती दिली. कार्यक्रमाचे आभार डाॅ.सिमा लव्हाटे तर सुञसंचालन डाॅ.अण्णासाहेब वराडे यांनी केले

प्रवरेच्या माजी विद्यार्थ्याने सुरु केलेल्या ई बाईक कंपनी अंतर्गत ई बाईक संशोधनासाठी यावेळी महाविद्यालयास देण्यात आली याव्दारे ई बाईकच्या संशोधनास चालना मिळणार आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!