नगर (शहर प्रतिनिधी):- नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी- उपसभातिपदीची निवड आज करण्यात आली. यात सभापतीपदी भाऊसाहेब बोठे व उपसभापतीपदी रभाजी सुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगर बाजार समिती सभापती पदी भाऊसाहेब बोठे , उपसभापतीपदी रंभाजी सुळ यांची निवड
माजी आमदार व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिल यांच्या मार्गर्शनाखाली ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब बोठे तर उपसभापतिपदी रभाजी सूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभापती व उपसभापतिपदाच्या दोन्ही जागांसाठी एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक देविदास घोडेचार यांनी काम पाहिले. जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्यापासून शिवाजी कर्डिले यांची नगर शहर व नगर तालुक्यांमध्ये दिवसात दिवस त्यांची ताकद वाढत चालली आहे. याची मूळ कारण त्यांची जनतेशी असलेला जनसंपर्क. जिल्हा बँक चेअरमन, नगर बाजार समिती या दोन्हीची सत्ता काबीज केल्यानंतर कर्डिले समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत मा. आमदार भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने सर्व १८ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. सोमवार दि. २२ रोजी नूूतन संचालकांची विशेष झाली. या सभेत सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली.
सभापतीपदासा व उपसभापतिपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. नगर तालुका व नगर शहर याचबरोबर राहुरी मतदार संघातील इतर गावे ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे. पुढील काही काळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ठाकरे शिवसेना यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. शिवाजी कर्डिले यांचा अनुभव पाहता तेही मुरब्बी राजकारणी आहे.