लोणी दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे बदललेल्या प्रवाहाप्रमाणे स्वतःमध्ये बदल केला तर स्पर्धेच्या युगात टिकाव धरणे शक्य होईल तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असते आपल्या व्यवस्थापनास आवश्यक असणारी कौशल्य आत्मसात करून उद्योगाच्या भरभराटीसाठी स्वतःचे योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे.
याकरता नवनवीन संकल्पनाची निर्मिती स्वतःची बलस्थाने, कमतरता, संभाव्य धोके आणि मिळणाऱ्या संधी यांचे विश्लेषण करून संकटावर मात करणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार उद्योगाच्या असलेल्या अपेक्षांची पूर्ती केली तरच आपण आपल्या व्यवसायाकरता त्याच्या भरभराटी करता काहीतरी करू शकू याकरता व्यक्तिगत हितापेक्षा समूहाच्या हितास प्राधान्य देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे रमेश घोलप यांनी केले.
पायरेन्स आयबीएमए.मध्ये उद्योग व्यवसायाच्या अपेक्षा ‘इंडस्ट्री एक्स्पेक्टेशन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पायरेन्स सचिव आणि संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायरेन्स आयबीएममध्ये आधुनिक काळातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे विकसित झालेल्या नवीन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी पायरेन्स आय. बी. एम. ए. च्या संचालिका डॉ.अनिता खटके यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगून युवकांनी नवीन कौशल्य आत्मसात करण्याकरता सदैव तत्पर असणे आवश्यक आहे व शिकण्याकरता ची अभिलाषा विद्यार्थ्यांमध्ये जागृत होणे गरजेचे आहे बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवीन कौशल्य संस्थेच्या विकासाबरोबर स्व- विकासास सहाय्यभूत ठरतात असे डॉ. खटके म्हणाल्या.
यावेळी पायरेन्स आय बी एम ए मधील डॉ. मनोज कुमार लंगोटे प्रा. प्रमोद बोऱ्हाडे प्रा. ऋतुजा कोतकर प्रा. योगेश आहेर प्रा. सौरभ दिघे प्रा. रेणुका तनपुरे प्रा. पूजा परजणे डॉ. निलेश आवारी प्रा. रनिता वलवे प्रा. प्रमोद गोपाळे प्रा. प्रशांत गोर्डे प्रा. मनीषा पटारे प्रा.वृषाली थोरात याचबरोबर पायरेन्स आय बी एम ए मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि एम बी ए, एमसीए, बी व्होक या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रतन टाटा क्लबचे डाॅ.निलेश आवारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार सिमरन पिंजारी या विद्यार्थ्यांनीनी केले