5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

बनावट कागदपत्रांच्या आधारे दिलं 17 कोटी रुपयांचं कर्ज ; कडूभाऊ काळेंच्या नागेबाबा पतसंस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे नेवासा कोर्टाचे आदेश !

नेवासा (प्रतिनिधी ):-वडिलांनी मुलांना १ हेक्टर १० आर जमीन सहा लाखांना दिली. त्यातली ८० आर जमीन पुन्हा मुलांनी वडिलांना तब्बल चार कोटी रुपयांना विकल्याचं भासवलं विशेष म्हणजे या खरेदी खतासाठी मुलांनी वीस लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीदेखील भरली. त्यानंतर वडिलांनी एकाला या जमिनीचं जनरल मुखत्यार पत्र करून दिले. त्या इसमानं ८० आर जमीन नवी दिल्लीच्या हितेश अविनाश चोरडिया याला विकली. मात्र त्याच्यावर ईडीची झाड पडलेले तो त्यात पूर्णपणे अडकला.

याच संधीचा गैरफायदा घेऊन जयराम गोरक्षनाथ काळे इसमानत ही जमीन स्वतःच्या भासवलं 2020 च्या खरेदी खतासाठी 2019 ची कागदपत्रे जोडली. या बोगस कागदपत्रांच्या आधारे कडू भाऊ काळे यांच्या नागेबाबा पतसंस्थेतून एकदा सात कोटी आणि नंतर दहा कोटी असे एकूण 17 कोटी रुपयांचं बोगस कर्ज मंजूर करून घेतलं पतसंस्थेने देखील या संदर्भातल्या कुठलीही शहानिशा न करता हे कर्ज मंजूर केलं.

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर येथील भानुदास यादव बानकर यांची ही मूळ जमेल आहे त्यांनी त्यांची मुलं अनुक्रमे पाराजी भानुदास बनकर आणि लक्ष्मण भानुदास बनकर यांना सहा लाख रुपये विकली. या जमिनीतली आय सी आर जमीन सदर दोन्ही मुलांनी वडिलांना चार कोटी रुपयांना विकल्यास बसवलं आणि त्यासाठी वीस लाख रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेठ यांनी नागेबाबा पतसंस्थेचे कडू काळे यांना जाब विचारला आणि या पद्धतीने अनेक गोरगरीब लोकांचे पैसे आहेत तुम्ही असं करू नका असं सांगितलं मात्र कडू यांनी हे प्रकरण इथेच थांबव, आपण भेटून घेऊ असं सांगितलं. दरम्यान प्रकाश शेठ यांनी नेवासा कोर्टात या संदर्भात तक्रार दिली त्या तक्रारीचे अनुषंगाने न्यायाधीश …. यांनी सहा जणांसह इतर अज्ञात इस्मानविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
कडूभाऊ छगन काळे चेअरमन नागेबाबा पतसंस्था, बाळासाहेब रेवणनाथ टिक्कल, राजेंद्र तखतमल गुगळे, राणी राजेंद्र गुगळे, जयराम गोरक्षनाथ काळे, अमोल मनोहर शिंदे आदींसह आठ ते दहा जणांविरुद्ध भादंवि ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, १२० (ब) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश नेवासा कोर्टाने दिले आहेत.  फिर्यादी प्रकाश शेटे यांच्या वतीने ॲडव्होकेट के. एस. ढेरे आणि ॲडव्होकेट स्वप्नील सोनवणे यांनी काम पाहिले.
आणि चव्हाट्यावर आला सहकारातला ‘स्वाहाकार’ !!!!!!!
नगर जिल्ह्यात सहकाराची चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली, बहरली. या चळवळीने महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोलाचा सहभाग नोंदविला. सहकारी तत्त्वावरचा आशिया खंडातला पहिला साखर कारखाना याच अहमदनगर जिल्ह्याने राज्याला दिला. मात्र दुर्दैवाने याच सहकाराच्या क्षेत्रात अनेक अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आणि सहकाराचा कधीचाच स्वाहाकार झाला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे यांनी या संदर्भात दि. ३१ .१० . २०१५ ते ६ . १० . २०२० यादरम्यान सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच सहकार क्षेत्रातला स्वाहाकार चव्हाट्यावर आला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!