पाथरे ( जनता आवाज वृत्तसेवा ):- येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रु./मार्च 2024 चा निकाल आज दुपारी घोषित झाला. 12 वी कला 97. 05 टक्के वाणिज्य विभाग 100 टक्के तर विज्ञान विभागाचा 99.40 टक्के लागला.
एकूण 269 विद्यार्थी पैकी 267 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल 99. 25 टक्के लागला आहे. कला विभागात प्रथम कु. म्हसे शितल आप्पासाहेब 78.67% द्वितीय कु . गोरे समृद्धी भाऊसाहेब 68.17% तृतीय कु. शेळके जयश्री साहेबराव 66.83%.क्रमांक पटकाविला आहे, वाणिज्य शाखेत प्रथम कु. जेजुरकर पूजा विलास 77 % द्वितीय कु. बेलकर ईश्वरी चांगदेव. 72 % तृतीय चि. जेजुरकर हर्षल राधाकृष्ण 70.4% अनुक्रमे प्राविण्य मिळविले विज्ञान शाखेत प्रथम कु. कडू साक्षी भाऊसाहेब 88% द्वितीय गायकर वैभव गोरक्षनाथ 86.83% व खळदकर तनुजा सुनील 86.83.% तृतीय अलवने श्रीराम प्रदीप 86.67% प्रविण्य मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, अहिल्यानगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे महाविद्यालयाचे प्राचार्य तांबे सर उपप्राचार्य वाणी मॅडम व सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.