23.1 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

हुगे पाटील’ कॉलेजची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

बालमटाकळी( जनता आवाज वृत्तसेवा ):- शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील समृध्दी हुगे पाटील ज्युनिअर कॉलेजने नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये समृध्दी हुगे पाटील ज्युनिअर कॉलेजमधील ओम सुखदेव मंडलिक याने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, अच्युत समाधान कदम याने ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.

तर सायली पांडुरंग पवार या विद्यार्थिनीने ९१.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला तसेच वीर अजय श्रीकांत ८९.६७ टक्के, पूजा राजू वाघुंडे ८८.८३ टक्के, बघाटे अमृता रामेश्वर ८८.५० टक्के, माळी सुरेखा भाऊसाहेब ८७ टक्के, काळूनके साक्षी चंद्रकांत ८६.६७ टक्के, भोसले कृतिका राजेश ८६.५० टक्के, कानडे रोहित सुदाम ८६.३३ टक्के गुण मिळवले असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यामागे संस्थेचे अध्यक्ष संदीप हुगे, अलका हुगे, जयश्री दसपुते, सीमा मस्के, प्रदीप हुगे यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे तसेच सर्वांच्या प्रयत्नांमुळे समृद्धी ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावीचे परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!