कर्जत( जनता आवाज वृत्तसेवा ):-कर्जत येथील आनंदराव फाळके पाटील ज्युनिअर कॉलेज महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल 96 टक्के लागला आहे. या महाविद्यालयाने यावर्षी देखील उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी गुणवत्ता असलेले विद्यार्थ्यांना तयार करून त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण कामगिरी करून घेण्याची एक वेगळी परंपरा या महाविद्यालयाने यावर्षी देखील जपले आहे. या महाविद्यालयाची इयत्ता बारावीची शास्त्र शाखेची विद्यार्थिनी प्रतीक्षा श्रीकांत गिरी या विद्यार्थिनीने शेतीशास्त्र या विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल खालील प्रमाणे….
शास्त्र विभाग प्रथम क्रमांक गुड्डी बापू सुळ 81 टक्के द्वितीय क्रमांक शिवानी अनिल खरसडे व नम्रता नवनाथ वाळुंजकर 80 टक्केतृतीय क्रमांक प्रवीण दादा मोहिते 76%या महाविद्यालयातील 35 विद्यार्थ्यांनी शेतीशास्त्र विषयांमध्ये 95 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, सचिव दामोदर अडसूळ, संस्थेचे सर्व विश्वस्त व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.