11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

संजीवनीच्या पाच प्राद्यापकांची सा. फु. पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड-श्री अमित कोल्हे संजीवनीच्या तज्ञ प्राद्याकांची विद्यापीठाकडून दखल ही सुध्दा संजीवनीची एक ओळख

कोपरगांव( प्रतिनिधी):- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन, फार्मसी महाविद्यालयाच्या एक व एमबीए विभागाच्या एक, अशा पाच प्राद्यापकांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर पाच वर्षांसाठी निवड झाली असुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज, एमबीए व संजीवनी फार्मसी महाविद्यालय या संस्था ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे येथे मुळातच उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे,

त्यांच्या आधुनिक ज्ञानाचा फायदा विभाग निहाय शाखांचा आधुनिकतेला अनुसरून अभ्यासक्रम बनविण्यासाठी होईल. संजीवनीच्या पाच प्राद्यापकांची एकाच वेळी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड होणे, ही बाब सुध्दा संजीवनीची अधिकची ओळख अधोरेखित करणारी आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की डॉ. माधुरी जावळे यांची इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, डॉ.बाळासाहेब आगरकर यांची इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, डॉ. मधुकर जाधव यांची सिव्हिल अँड एनव्हायरनमेंटल टेक्नॉलॉजी, डॉ. किशोर साळुंखे यांची फार्मास्युटिक्स डीपार्टमेंट व डॉ. विनोद मालकर यांची मॅनेजमेंट स्टडीज विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे १२९ इंजिनिअरींग कॉलेजेस, ६६ बी. फार्मसी महाविद्यालये व १८१ एमबीए शिक्षण संस्था आहेत. या सर्व महाविद्यालयांमधुन संजीवनीच्या पाच प्राद्यापकांची अभ्यासमंडळावर निवड होणे ही बाब संजीवनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे तसेच कोपरगांव तालुक्याला भुषणावह आहे. पाचही प्राद्यापकांकडे आपापल्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील नवनवीन बदलांचा, कार्पोरेट जगताला हव्या असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास असल्यामुळे या पाचही ज्ञानाधिष्ठीत प्राद्यापकांची दखल विद्यापीठाने घेतली आहे. त्यांच्या आपापल्या विभागाच्या टीमकडून संबंधित विषयांच्या अभ्यासक्रमांची वर्ल्डक्लास पुनररचना होवुन अनेकांना चांगली नोकऱ्या निश्चित मिळेल तर काही विध्यार्थी त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकतील, असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे अभिनंदन केले. तर श्री अमित कोल्हे यांनी या पाचही प्राद्यापकांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संगणक तज्ञ श्री विजय नायडू, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर व डॉ. विपुल पटेल उपथित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!