11.8 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार होण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी ):- सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर भाजप शिंदे शिवसेना सरकारने अनेक दिवसापासून असलेला मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्यामध्ये मंत्रिंमंडळ विस्ताराला परवानगी मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार हा 23 किंवा 24 मे ला होण्याची शक्याता आहे. या नेत्यांची लागणार लॉटरी मंत्रिपदासाठी शिंदे गट, भाजपमधील अनेक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यातील काहींना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशा आमदारांची नाव पुढे आली आहेत. ज्यामध्ये 1) भरत गोगवले ( जलसंधारण), 2) संजय शिरसाठ ( परिवहन किंवा समाजीक न्याय मंत्री ), 3) प्रताप सरनाईक( गृहनिर्माण मंत्रालय ) , 4) बच्चू कडू (दिव्यांग विकास मंत्री), 5) सदा सरवणकर, 6) यामिनी जाधव, 7) अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग? फडणवीस लागले कामाला, समोर आला आहे.मास्टर प्लॅन शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. गेल्या आठवड्यात न्यायालयानं अपात्रेसंदर्भात निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर 2024 मधील लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप व शिंदे शिवसेना गट लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी पक्षातील आमदारांची इच्छा आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!