23.7 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल 

श्रीगोंदा शहर( जनता आवाज वृत्तसेवा ) :-  श्रीगोंदा येथील एका घरकामगार करणाऱ्या महिलेवर तरुणाने अत्याचार केला असून त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथे घडली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब उत्तम दांगडे (रा. घुगलवडगाव, ता. श्रीगोंदा) यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.र.नं560/2024 नुसार भा.दं.वि.क. 376, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दि. 02 जून 2024 रोजी सायंकाळी 7 वा दरम्यान फिर्यादी या आपल्या घुगलवडगाव शिवारातील भुईमुगाचे शेतात एकट्याच शेंगा काढत तो असताना आरोपी भाऊसाहेब दांगडे तेथे आले व मागील तीन वर्षांपुर्वी दिलेली केस 15 मे 2024 रोजी कोर्टात मिटवुन का घेतली नाही. तु जर केस मिटवून घेतली नाही, तर तुला व तुझ्या दोन्ही मुलांना जिवे ठार मारीन ? तुझ्या घरात दिवा लावायला माणुस ठेवणार नाही, अशी धमकी देवुन आरोपी याने फिर्यादीचे छातीमध्ये पोटात कमरेला लाथाबुक्यांनी मारहाण करुन, काहीतरी धारधार वस्तुने फिर्यादीचे डाव्या पायांचे मांडीवर व डावे छातीवर वरील बाजुस मारुन जखमी करुन फिर्यादीने आरडाओरड केली असता आरोपी याने फिर्यादीचे तोंड दाबुन फिर्यादीवर अत्याचार केला, असे फिर्यादी यांचे ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे नोंदविण्यात आलेल्या दवाखाना जबाबवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो. नि. ज्ञानेश्वर भोसले, तपासी अधिकारी पोसई संपत कन्हेरे करीत आहेत.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!