श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगांव ग्रामपंचायत येथील दोन जागा रिक्त झाल्या होत्या . या दोन जागांसाठी दि. 18मे रोजी मतदान घेण्यात आले होते काल दि. 19मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली यात मुठेवडगांव येथील दोन्ही जागांवर भाजप व लोकसेवा विकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलच्या सौ. संगीता शंकरारावं मुठे व कानडे गटाच्या सौ. निर्मला मुठे तर किशोर साठे व सोमनाथ रुपटक्के यांच्यात लढत झाली. याठिकाणी ऐकून 943 मतदानापैकी 875 मतदान झाले त्यापैकी संगीता शंकरारावं मुठे यांना 559 (विजयी) मते पडली तर निर्मला मुठे यांना 307 (पराभूत) मते पडली तर किशोर साठे यांना 550 (विजयी) मते पडली तर सोमनाथ रुपटक्के यांना 318 (पराभूत) मते मिळाली . दोन्ही जागेवर विखे मुरकुटे गटाचा विजय झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
मुठेवाडगांव ग्रामपंचायत विखे- मुरकुटे गटाच्या तब्यात , सत्ताधारी गटाचा दारून पराभव
माळवाडगाव (प्रतिनिधी) :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगांव ग्रामपंचायतिमध्ये पोटनिवडणूक होऊन दोन जागांसाठी मतदान घेण्यात आले काल मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये मुठेवडगांव येथील दोन्ही जागांवर विखे मुरकुटे गटाचे उमेदवार निवडून आले.
मुठेवडगांव ग्रामपंचायत पोट निवडणूक ही कानडे गटाचे बाजार समितीचे  माजी संचालक विश्वनाथ मुठे , माजी सरपंच भाऊसाहेब मुठे, रघुनाथ मुठे, भाजप जिल्हा उपआध्यक्ष बबनराव मुठे, विद्यमान सरपंच सागर मुठे यांच्या नेतृत्वा खालील ग्रामविकास मंडळ विरुद्ध ना.विखे पाटील यांचे कट्टर समर्थक भाजपा श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष डॉ. शंकरारावं मुठे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे कट्टर समर्थक कारेगाव भागाचे शिवाजी मुठे यांच्या नेतृत्वा खालील परिवर्तन मंडळ अशी लढवली गेली  या निवडणुकीत भाजप चे  तालुका उपाध्यक्ष डॉ. शंकरारावं मुठे यांच्या पत्नी सौ.संगीता मुठे यांना उमेदवारी  मिळाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती मात्र विखे मुरकुटे गटाने सत्ताधारी गटाचा दारून पराभव करत  दोन्ही जागांवर विजय मिळवला .
मुठेवडगांव ही नऊ सदस्य ग्रामपंचायत आहे ह्या विजया मुळे विखे मुरकुटे गटाच्या आता सहा जागा झाल्या आहे तर  सत्ताधारी गटाच्या पराभावामुळे आता त्यांच्या कडे तीनच जागा शिल्लक राहिले आहे त्यामुळे आता विखे मुरकुटे गटाचे सरपंच व उपसरपंच पाहायला मिळणार आहे 
हा विजय सर्वसामान्यांचा आहे सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर आरोप करत मी खुर्ची साठी सत्तेसाठी ही निवडणूक लढवत आहे मी मंदिरात सत्ते साठी खोट्या शपता घेतो असे सर्व सामान्य जनतेला भासवले जात होते पण बाबांनीच चमत्कार करत हा एव्हडा मोठा विजय मिळवून दिला हा विजय माझा नसून माझ्या प्रत्यक कार्यकर्त्याचा आहे त्या मुळे मी आजच स्पष्ट करतोकी या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीचे कोणते ही पद माझ्या घरात घेतले जाणार नाही कारण मी खुर्ची साठी व पदा साठी नसून मी ह्या माझ्या सर्व सर्वसामान्य जनते कामासाठी , त्यांच्या अडचणी सॊडावण्या साठी सदैव तत्पर राहील.
—– डॉ. शंकरारावं मुठे –  श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी




