बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले हे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या सर्व गावच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या रस्त्यामुळे शाळकरी मुलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला असून या रस्त्यावर खड्ड्यांमुळे होणारे अपघातही कमी होणार आहेत. तसेच तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पेशंटला नेण्यासाठी खराब रस्त्यामुळे जो त्रास सहन करावा लागायचा तो त्रासही आता हा रस्ता पूर्णत्वास नेल्यामुळे जाणवणार नाही .
भेंडा ते गोंडेगाव या रखडलेल्या डांबरीकरण रस्त्याचे काम आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने पूर्ण
नेवासा फाटा( प्रतिनिधी ):-
दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा भेंडा ते गोंडेगाव हा रस्ता अनेक वर्षांपासून रखडलेला होता.  आमदार शंकरराव गडाख यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा रस्ता पूर्ण केल्यामुळे या डांबरीकरण  रस्त्यालगतच्या लाभधारक भेंडा खुर्द, भेंडा बुद्रुक, गोंडेगाव ,दिघी ,नजीक चिंचोली, म्हस्ले, बाभूळखेडा या गावांनी आमदार शंकरराव गडाख यांचे विशेष आभार मानले.
त्याचप्रमाणे नेवासा तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामेही आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागलेली आहेत. त्यामुळे नेवासा तालुक्याच्या विकासात आमदार आमदार शंकरराव गडाख यांचा प्रयत्नाने भर पडत आहे.
गेल्या 4 ते 5 वर्षापासून सदर काम बंद होते  शंकरराव गडाख यांनी शासन दरबारी प्रयत्न करून बंद पडलेले काम पूर्णत्वास आणले. आणि हा रस्ताही पूर्ण करून घेतला. हा रस्ता 5.50 की.मी.चा आहे.तसेच या मार्गावरून दळणवळण करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहे.




