21.4 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

अल्पवयीन मुलीवर बलात्कार श्रीरामपुरसह शिर्डीतील हॉटेलमध्ये वेळोवेळी अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) : –श्रीरामपूर शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या पिझा हट कॅफे येथे एका १७ वर्ष वयाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगीक अत्याचार करत बलात्कार केला.

तर याच विद्यार्थीनीवर शिर्डीतील साई मलीक हॉटेलमध्ये एका आरोपीने बळजबरीने बलात्कार केला. अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामुहीक बलात्कार केला म्हणून पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी ललीत (रा. शिरसगांव), अनिकेत व महेश (दोघे रा. माळेवाडी) या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादवि कलम ३७६, ३७६ (ड), ३५४, ३२३, ५०४, ५०६ व बालकांचे लैगीक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखवल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.

जिल्ह्यासह तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा उठवत आरोपींनी सामुहीक बलात्कार करून विनयभंग केला व पिडीतेला धमकी दिली. त्यामुळे पालक वर्गात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!