24 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर येथे कत्तली करीता बाधुन ठेवलेल्या ९ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका एकुण ३,७०,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

 श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर येथे कत्तली  करीता बाधुन ठेवलेल्या ९ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका एकुण ३,७०,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई.दि. 13 रोजी 8:30 वा. चे सुमारास मा. पोनि, नितीन देशमुख साो. यांना गुप्त बातमी मिळाली को, काझीबाबा रोड, वार्ड नं.02, श्रीरामपूर येथे एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्याचे प्रयोजनाने अंत्यत निर्दयीपणे, चारापाण्याची सोय न करता बांधुन ठेवलेली आहेत.

अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि, नितीन देशमुख साो. यांनी तात्काळ तपास पथक व विट अंमलदार यांना सदर ठिकाणी जावून खात्री करुन कारवाई करण्याचे तोडी आदेश दिल्याने पोलीस पथक तात्काळ दोन पंचासह सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी 9 लहान मोठे गोवंशीय जनावरे हे त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधुन ठेवलेली दिसली. तेव्हा सदर बांधुन ठेवलेल्या जनावराचे मालकांचे नाव गावाबाबत आजुबाजुस विचारपुस केली असता त्याचे नाव  समिर रशिद कुरेशी, वय 27 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला वार्ड नं.02, श्रीरामपूर  जावेद मेहबुब कुरेशी, वय 35 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला वार्ड नं.02 श्रीरामपूर असे असल्याचे समजले. सदर इसमाचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. सदर ठिकाणी खालील प्रमाणे गोवंशीय जातीचे जनावरे मिळुन आले.

त्याचे वर्णन खालील प्रमाणे.3.50,000/- रु.किं.च्या 07 गोवंशीय जातीच्या गायी काळया पांढऱ्या व तांबड्या रंगाच्या प्रत्येकी 50,000/- रु.कि..20,000/- रु.कि.ची 02 गोवंशीय जातीच्या गायीची वासरे प्रत्येकी 10,000/- रु. किमतीची अंदाजे.3,70,000/- रु एकुण.येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्याचे प्रयोजनाने अंत्यत निर्दयीपणे, चारापाण्याची सोय न करता बांधुन ठेवलेली मिळुन आल्याने ते तात्काळ ताब्यात घेवनु इसम नामे 1) समिर रशिद कुरेशी, वय 27 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला वार्ड नं.02, श्रीरामपूर 2) जावेद मेहबुब कुरेशी, वय 35 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला वार्ड नं.02 श्रीरामपूर यांचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. 616/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9, सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (च) 11 (ज) प्रमाणे. तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुवर्म साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पो. हेड .कों. शफिक शेख, पो.ना. भैरवनाथ अडागळे, पो.कों.राहुल नरवडे, पो.कों. रमिझराजा अत्तार, पो.कों.संभाजी खरात, पो.कों.अजित पटारे, पो.कों. धंनजय वाघमारे, पो.कों. गौरव दुर्गुळे. पो.कों.आदिनाथ आंधळे, पो.कों.प्रचिण कांबळे, पो.कों.अमोल गायकवाड, पो. कों.आकाश वाघमारे पो.कों. रामेश्वर तारडे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों/ शफिक शेख हे करीत आहेत.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!