श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- कत्तली करीता बाधून ठेवलेल्या ७ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका एकूण २ लाख ८० हजार रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई,
दि. १६ रोजी ९ वा. चे सुमारास मा. पोनि, नितीन देशमुख साहे. यांना गुप्त बातमीदक्षर्गमार्के बातमी मिळाली आहे की, नवी दिल्ली परिसर सार्वजनिक शौचालया जवळ, वार्ड नं. २ , श्रीरामपूर येथे एका पंत्र्यांच्या शेडच्या आडोशाला तसेच संजयनगर पाण्याच्या टाकीजवळ मोकळया जागेत काही गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्याचे प्रयोजनाने अंत्यत निर्दयीपणे, त्यांची चारापाण्याची सोय न करता बांधुन ठेवलेली आहेत. सदर ठिकाणी जावून खात्री करून मिळून आल्यास कारवाई करा असे तोंडी आदेश दिल्याने पोलीस पथक तात्काळ दोन पंचासह सदर ठिकाणी जावून पाहणी केली.
असता सदर ठिकाणी ७ लहान मोठे गोवंशीय जनावरे हे त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयोपणे बांधुन ठेवलेली दिसली. तेव्हा सदर बांधुन ठेवलेल्या जनावराचे मालकांचे नाव गावाबाबत आजुबाजुस विचारपूस केली असता त्याचे नाव साहिल फिरोज शेख (कुरेशी), रा. सुभेदार वस्ती, वार्ड नं. २ , श्रीरामपूर महेबुब शेख, रा. उस्मानिया मस्जित जवळ संजयनगर, वार्ड नं. २ , श्रीरामपूर असे असल्याचे समजले. सदर इसमाचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांच्यासह वरील नमुद ठिकाणी गोवंशीय जातीचे जनावरे मिळुन आले.
त्याचे वर्णन खालील प्रमाणे. १,५0,000/ रु.किं.ची दोन गोवंशीय जातीची काळया, पांढऱ्या, तांबडया रंगाच्या जर्सी गायी प्रत्येकी ७५ ,ooo/- रु.कि.अ. ५० ,ooo/ रु.किं.ची एक गोवंशीय जातीची तांबडया पांढऱ्या रंगाची गावरान गाय रु. किं.अं. 20,000/ रु. किं. चे दोन गोवंशीय जातीचे तांबडया पांढऱ्या रंगाचे गावरान वासरे प्रत्येकी १० ,ooo/- रु.कि.अं. ६० ,ooo/- रु.किं.चे दोन गोवंशीय जातीचे वासरे काळया पांढऱ्या रंगाची प्रत्येकी ३० ,ooo रु. किं.अं. २,८o,ooo/- रु एकुण किंमतीचा मुद्देमला जप्त करण्यात आला.
येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्याचे प्रयोजनाने अंत्यत निर्दयीपणे, चारापाण्याची सोय न करता बांधुन ठेवलेली मिळुन आल्याने ते तात्काळ ताब्यात घेवनु इसम नामे साहिल फिरोज शेख (कुरेशी), रा. सुभेदार वस्ती, वार्ड नं. २ , श्रीरामपूर. महेबुब शेख, रा. उस्मानिया मस्जित जवळ संजयनगर, वार्ड नं. २ श्रीरामपूर यांचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. ६१५ / २०२४ , व ६१६ / २०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित कायदा सन २०१५ चे कलम ५,५ (ब), ९ , सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (च) ११ (ज) प्रमाणे. दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबमें साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहे कॉ. शफिक शेख, पोना. रघुवीर कारखेले, पोना. भैरवनाथ अडागळे, पोकों. राहुल नरवडे, पोकॉ. रमिझराजा अत्तार, पोकों.गौतम लगड, पोकों.संभाजी खरात, पोकों. अजित पटारे, पोकों. धंनजय वाघमारे, पोकों. अमोल गायकवाड, पोकों. रामेश्वर तारडे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहे.कों.शफिक शेख हे करीत आहेत.



