शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ): – श्री साईमंदिरात फुल हार प्रसाद सुरु करावे याबाबत उच्च न्यायालयात काही विशेष घडामोडीस सुरवात झाल्याने या पार्श्वभूमीवर मा. खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथिल हॉटेल शांतीकमल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस या व्यावसायावर अवलंबून असणारे शेतकरी व शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलतांना सांगितले की, फुल हार विक्री कशी करावी याची कार्यपद्धती कशी असावी. यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयासमोर ञिसदस्सीय समितीने अहवाल जमा केला आहे.
याविषयी माननीय न्यायालयात काही शेतकरी न्यायालयात गेले होते. त्यामुळे आता माननीय न्यायालयाने फुल हार विक्रीची परवानगी दिल्यास त्यांनतर त्याची विल्हेवाट कशी लावणार याविषयी लेखी अहवाल साई संस्थानकडे मागीतला असुन यानंतर न्यायालय फुल विक्रीची परवानगी देणार आहे.याबाबत सुरु असलेल्या हालचाली संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी काल फुल उत्पादकांची बैठक बोलावली असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
या बैठकीत शेतकऱ्यांची एक समिती बनून याविषयी योग्य ते निर्णय होतील. यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष असुन त्यासाठी पुर्वतयारी म्हणून आपण शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले
शिर्डीतील गुन्हेगारीस बसणार चाप
शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीस आळा बसवा. यासाठी फुलहार बंदीचा निर्णय घेण्यात आला. परंतु अपेक्षेप्रमाणे गुन्हेगारी कमी झालेली दिसत नसल्याने फुल विक्रेत्यांचा व गुन्हेगारांशी सबंध असावा असे वाटत नाही. आजच्या शिर्डीतील गुन्हेगारी परीस्थीती पेक्षा एका महिन्याच्या आतच शिर्डीतील गुन्हेगारी निश्चितच कमी करू, अशी प्रतिक्रिया मा. खा. सुजय विखे पा. यांनी दिली आहे.