24.4 C
New York
Friday, August 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

ACB ची नगरमध्ये मोठी कारवाई, मनपा आयुक्ताचे दालन सील लाच मागितल्याचा आरोप

नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या नाशिक येथील पथकाने आज अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे दालन सील करण्यात आले आहे. त्यांच्या घराचीही तपासणी करण्यात येत असून नगरचना विभागातील अधिकाऱ्यांकडेही यासंबंधी चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

नगरमधील नगररचना विभागाशी संबंधित तक्रार मिळाल्याने ही कारवाई सुरू असल्या सांगण्यात आले. अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. यासंबंधी अधिक माहिती देण्यासही पथकातील अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. नगर आणि नाशिकमध्येही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!