spot_img
spot_img

महाराष्ट्रातील एकात्मिक कृषी मूल्यसाखळी विकास परिसंवादात प्रवरेच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग

लोणी दि.१७( प्रतिनिधी):- मुंबई येथे ‘चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ यांच्या वतीने एकदिवसीय एकामित्क कृषी मूल्यसाखळी विकास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 या परिसंवादामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी महाविद्यालयांचे एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परीसंवादामध्ये मुख्य अन्न म्हणून आणि आरोग्यदायी अन्न म्हणून परिचित असलेल्या मिलेट्स अर्थात बाजरी, नाचणी वर्गीय पिकांच्या संवर्धना साठी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी अनेक तज्ञ मार्गदर्शन केले.यावेळी राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याशी विद्यार्थ्यांनी सवांद साधला. सदर उपक्रमाच्या समन्वय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. ज्योती झिरमिरे यांनी केला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री महाराष्ट्र ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालतयाचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!