बेलापूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- नशायुक्त गोळ्यांच्या वापर करून बनविलेल्या घातक दारुच्या संशयातून तालुक्यातील उक्कलगाव येथे एका साठ वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी साडे आठ वाजेच्या सुमाराला घडली.संतप्त असंख्य महिलांनी ररत्यावर गोळा होऊन दारुचे अड्डे उध्वस्त केले.
ज्ञानेश्वर चिमाजी मोडे असे मुत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.गावामध्ये अश्या अनेक घडल्या आहे.त्यामुळे यांच्या संसारावर राखरांगोळी झाल्याचे संतप्त महिलांचा रोष अनावर झाला.यास जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. अवैधारित्या दारु अड्डे चालणाऱ्याना कोण पाठबळ देतो कोण? तर त्यात कोणाचे हात बडबडले तर ना? असा सवाल संतप्त महिलांनी स्थानिक प्रशासन त्याबरोबर पोलीस प्रशासनाला उपस्थित केला.
गावामध्ये अवैधरित्या चालणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर असंख्य महिलांनी गावातले सर्वच दारुचे अड्डे उध्वस्त करून दुकाने पेटवून दिले.त्यामुळे गावामध्ये तंग काहीकाळ तणावाचे वातावरण झाले.अवैधारित्या सुरु असलेले अड्डे बंद न झाल्यास ते चालविणाऱ्यावर कारवाई न केल्यास अंत्यविधी न करण्याचा निर्णय महिलानी घेतला होता.त्यावेळी अंसख्य महिलांनी मोर्चा वळवून अड्डे उदध्वस्त केले.विशेष म्हणजे गावामध्ये मोठी घटना घडून देखील पोलीस प्रशासनाचा एक कर्मचारी हजर झाल्याने या कारवाईकडे शंका उपस्थित केली. ग्रामपंचायती समोर असणाऱ्या महिला आक्रमक झाल्या होत्या.अवैधरित्या दारुचे अड्डे पेटवून दिले त्यावेळी गावातील जिल्हा परिषदे आवाराबोहरील व मागील बाजूस आणि पानटपऱ्यावरील अवैधरित्या खुलेआम दारूचे धंदे करणारे मात्र दुकाने बंद पळून गेले होते.महिलाचा आक्रमक होऊन यांच्या घरात घासून दारुच्या भरलेल्या बाटल्या ररत्यावर आणून फोडून टाकल्या.घराची झाडझाडती घेत असताना घरात रिकाम्या बाटल्याचा खच समोर आल्याने बंद घराचे कुलूप
तोडले.गावातील ज्ञानेश्वर मोडे याने सोमवारी दारुच्या गुत्त्यावर घेतली होती.म्हणून त्यांची प्रकृती खालावली होती.त्यातच मुत्यू झाल्याचे असा आरोप महिलांनी केला.त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने गावकऱ्यानी वर्गणी नाणी गोळा करून त्यास स्थानिक आरोग्य उपकेद्रमध्ये दाखल करण्यात आले.मात्र तत्पूर्वीचा मुत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी सकाळी परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर महिला गोळा होत संतप्त झाल्या.त्यांनी गावातील दारु गुत्त्याकडे मोर्चा वळविला त्यानंतर महिलांनी शाळेजवळ सुरू असलेला दारु गुत्ता तोडला.त्यातील सर्वच सामान रस्त्यावर आणून पेटवून दिले काही वेळातच गावातील महिला बचत तसेच सामाजिक कार्यकर्त्या महिला पुरुष जमा झाले.त्यावेळी गावातील जेथे जेथे दारु गुत्ते सुरु होते तेथे महिलांनी पोलीस समवेत हल्लाबोल केला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने आणखी संशय समोर आला.
..