20 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

कृषी दिन हा कार्यालयासह थेट शेतबांधापर्यंत साजरा करावा -प्राचार्य डॉ. उंबरकर

संगमनेर जनता आवाज वृत्तसेवा  : मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सन्मानार्थ कृषीपदवीधरांनी कृषी दिन हा कार्यालयाबरोबरच थेट शेतबांधापर्यंत साजरा करावा, असे प्रतिपादन वृंदावन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. उंबरकर यांनी केले.

महानायक वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रम पार पडले. यावेळी महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

प्राचार्य डॉ. उंबरकर म्हणाले की, कृषी दिन हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणणारे, शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीणारे, शेतकऱ्यांचा जाणता राजा व आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत म्हणून संबोधले जाणारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या सन्मानार्थ प्रत्येक कृषीपदवीधरांनी कृषी दिन हा कार्यालयाबरोबरच थेट शेतबांधापर्यंत सर्वत्र साजरा करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमासाठी डॉ. आर. एस गुंजाळ, वेलफेअर फाउंडेशन, संगमनेर (गुंजाळवाडी पठार) संस्थेच्या वृंदावन कृषी महाविद्यालयाचे डॉ. वाय. एस एखंडे, डॉ. ए. जी. महाले, प्रा. ए. एन. सहाणे, प्रा. डी. बी. गोलांडे, एस. बी. गजे, एम. एल. बनसोडे तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!