लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ) : – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कृषी व संलग्न शास्त्र संस्थेच्या ३१ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक येथे निवड झालेली आहे.
सदर विद्यार्थी हे बँकॉक येथील जगातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत अशा एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेमध्ये दि. ३ जुलै ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान कृषी प्रगत तंत्रज्ञान संबधित, स्मार्ट फार्मिंग टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल अग्रिकॅल्चर डेव्हलपमेंट इन कॉटेक्स्ट ऑफ एन्विरोनमेंट चेंज, अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, रिमोट सेंसिंग, हायटेक फ्लोरिकल्चर, उती संवर्धन, डिएनए तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आदी क्षेत्रात प्रशिक्षण घेणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरील विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
डॉ. उत्तमराव कदम म्हणाले की, सदर विद्यार्थ्यांना पदवी पूर्व अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना मिळालेली ही संधी खूपच मोलाची असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय होणार आहे. त्यासाठी त्यांना विविध कृषी आधारित आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच अनुभवी आंतरराष्ट्रीय प्राध्यापक वृंद, आणि इतर देशातील विद्यार्थी इत्यादी बरोबर चर्चा करण्याची व शिक्षण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
संस्था अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम प्रथमच राबवीत असल्याने तो यशस्वी होण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य महसूलमंत्री विखे पाटील यांचे लाभले आहे.
प्रवरा कृषी व संलग्न शास्त्र संस्थेच्या ३१ विद्यार्थ्यांना एआयटी बँकॉक येथे प्रशिक्षणासाठी निवड होण्यासाठी संचालक डॉ. उत्तमराव कदम, डॉ. आशिष क्षिरसागर, डॉ. विशाल केदारी, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण समन्वयक प्रा. सत्येन खर्डे, प्रा. शुभम मुसमाडे, प्रा. स्वरांजली गाढे, डॉ. राहुल नवसारे, डॉ. मनीषा खर्डे, डॉ. सरिता साबळे, डॉ. दिपाली तांबे, डॉ. उदय पाटील, प्रा. शैनेश आहेर आदींचे मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून उद्या, दि. ३ जुलैला सकाळी ८.३० वाजता एआयटी, बँकॉक येथे पोहोचण्यासाठी प्रयाण करणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने करून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे, अशा त्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त माहिती व ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ व सहसचिव भारत घोगरे उपस्थित होते.
विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, संस्थेचे संचालक शिवाजीराव जोंधळे, भाऊसाहेब जहऱ्हाड, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे आदींनी अभिनंदन केले.