लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी येथेमहसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागाअंतर्गत मोफत दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली आहे.
या अभ्यासक्रमामध्ये लॅब टेक्निशिअम रिसर्च अँड क्वालिटी कंट्रोल आणि असिस्टंट मेन्टेनन्स (फार्मा बायोलॉजिकस अँड मेडिकल डिवाईसेस) हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले असून यामार्फत विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास विभाग असून या विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम सतत राबविले जातात अशी माहिती महाविद्यालयाचे कौशल्य विकास विभाग प्रमुख प्रा. मनीषा सोनवणे यांनी दिली.
सदर अभ्यासक्रमासाठी दहावी व बारावी शास्त्र उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असून ईच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा अशे आवाहन प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी केले आहे.