लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राहाता तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून जेष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के यांची राहाता तालुकाध्यक्षपदी तर गाडेकर,कोळसे,आहेर,गोऱ्हे,जेजुरकर आदींची विविध पदांवर निवड करण्यात आली.
राहाता तालुका मराठी पत्रकार परिषदेचे मावळते अध्यक्ष राजकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्यकारिणी सदस्य नवनाथ दिघे,प्रमोद आहेर आणि जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणी ता.राहाता येथे शुक्रवारी परिषदेच्या सदस्यांची बैठक पार पडली.या बैठकीत तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.दादासाहेब म्हस्के(अध्यक्ष),मनोज गाडेकर,संजय कोळसे(उपाध्यक्ष),गणेश आहेर,श्रीरंग गोऱ्हे(सरचिटणीस),महेंद्रजेजुरकर(खजिनदार),कार्यकारिणी सदस्य-प्रा.रवींद्र काकडे,सचिन बनसोडे,रवि महाले,सुहास वैद्य,बाळासाहेब सोनवणे,कैलास विखे,प्रमोद कुंभकर्ण व प्रा.एस.आर.बखळे, तालुका सल्लागारपदी नवनाथ दिघे,प्रमोद आहेर,दिलीप खरात,डॉ.राजकुमार जाधव,नानासाहेब शेळके यांची निवड करण्यात आली.नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तालुक्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन त्यांच्या न्याय,हक्क आणि संरक्षणासाठी काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष दादासाहेब म्हस्के यांनी यावेळी सांगितले.बैठकीला तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.