बाभळेश्वर (जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिर्डी विधानसभेच्या अध्यक्षपदी साहिल संजय खर्डे यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष खर्डे यांना निवडीचे पत्र अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार व अजित पवार यांनी आपले वेगळे गट निर्माण केल्यानंतर नगर जिल्ह्यातील बहुतांशी कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाला समर्थन दिले आहे.याच अनुषंगाने साहिल संजय खर्डे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिर्डी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केल्याने जिल्ह्यातील राजकारण पूर्णतः बदलून गेले आहे.
नगर जिल्ह्यासह शिर्डी विधानसभेतील अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाला पसंती दिली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व प्रशासनावर चांगली पकड तसेच शिर्डी विधानसभेचा राजकिय अभ्यास असल्यानेच साहिल खर्डे यांची शिर्डी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिले आहे.
निवडीनंतर साहिल खर्डे म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिर्डी विधानसभेच्या अध्यक्ष पदावर काम करत असताना सर्व विद्यार्थी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. शिर्डी विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शरदचंद्रजी पवार गटाचा उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे खर्डे यांनी सांगितले आहे.त्यांच्या निवडी बद्दल ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के पाटील, अरुण कडू, कृषिभूषण प्रभावती घोगरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के यांनी अभिनंदन केले.