या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे,अतांञिक विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, आश्वी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, डॉ. सुवर्णा जाधव तसेच महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. प्रमोद विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धकांनी सदर स्पर्धेची तयारी केली होती.
प्रवरेतील आश्वी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय अॅथलेटिक्सस्पर्धांसाठी निवड
आश्वी दि.१६ (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशन व अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांचे वतीने नुकत्याच घेतलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेतून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्दच्या आव्हाड गणेश राजेंद्र याची डकेत लॉनसाठी, अविनाश मधुकर फड याची हॅमर थ्रोसाठी तर सोहम दत्तात्रय आव्हाड याची लॉंग जम्प व ट्रिपल जम्पसाठी राज्यस्तरीय खुल्या मैदानी स्पर्धांसाठी त्यांची निवड झाली.
महाविद्यालयीन शिक्षण सांभाळून विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारामध्ये प्राविण्य मिळवितात ही बाब महाविद्यालयासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.



