कोपरगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- विवाहित महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ‘पाटील’ असे बनावट नाव सांगून मैत्री करून तिच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यात घडली.
आसिफ युनूस पठाण (वय ३०, रा. राहाता) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, विवाहित पीडित महिला (वय २५) कोपरगाव तालुक्यातील एका गावात राहात आहे.
विवाहित महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ‘पाटील’ असे बनावट नाव सांगून मैत्री करून ४ जुलै २०२४ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने आरोपी असीफ पठाण याच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे करीत आहे.