लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणी येथील कृषि व संलग्ननित महाविद्यालयात कृषी व इतर संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सन २०२४-२५ साठी मोफत आनलाईन अर्ज भरण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती संचालक प्रा. डॉ उत्तमराव कदम यांनी दिली.
जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना कृषी व संलग्न अशा पदवी प्रवेशासाठी अर्ज दाखल करायचा आहे असे विद्यार्थी या केंद्रावर मोफत अर्ज भरू शकतात. अर्ज भरणे,कागदपञे याशिवाय करिअर मार्गदर्शन यासाठी स्वतंञ कक्ष सुरु असून सदर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही १५ जुलै पर्यंत असून या सुविधेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी व संलग्न शास्त्र संस्थेचे संचालक प्रा डॉ. कदम यांनी केले आहे.