20 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

पारनेर तालुक्यात ‘सैराट’ची पुनरावृत्ती? आंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या पतीची केली निर्घृण हत्या

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पारनेर  तालुक्यातील एका गावात आंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या पतीची निर्घृण हत्या केल्याचे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

आंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी काही आरोपींना अटकही करण्यात आली असून तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, पारनेर तालुक्यातील एका गावात एकमेकांच्या शेजारी राहात असलेल्या आंतरजातीय तरुण मुलाचे आणि शेजारील मुलीचे प्रेम होते. हे प्रेम आंतरजातीय असल्याने दोघांच्या कुटुंबीयांचा विरोध होणार, हे त्यांना माहित होते. मात्र, प्रेमाला जात नसते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लग्न केले आणि तेथे सुखी संसार करू लागले. पण मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नसल्याने त्यांना ते सतत खटकत होते.

शेवटी मुलीच्या कुटुंबीयांनी घरातील भांडण मिटवण्याच्या बहाण्याने मुलास बोलावून घेऊन त्याचा खून केला. इतकेच नव्हे तर, त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळूनही टाकला. आरोपींना अटक केल्याचे वृत्त समजले आहे. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे हकनाक तरुणाचा जीव गेला आहे.

समाज आज प्रगत झाल्याच्या गप्पा मारतो, प्रगतीचा आव आणतो, परंतु आजही समाजातील जातीय व्यवस्था संपलेली नाही हेच वास्तव असल्याचे या घटनेतून दिसते. या खून प्रकरणामुळे मुलीचा सुखी संसार मोडला आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांनाही अटक झाली. शेवटी, दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होत आज उघड्यावर आल्याचे चित्र आहे. या घटनेमुळे तालुक्यामध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!