20 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोपरगाव मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी गणेश दाणे, कार्याध्यक्षपदी अरुण कदम

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची कोपरगाव तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. 

यामध्ये तालुकाध्यक्षपदी गणेश दाणे, उपाध्यक्ष महेश नाईक,अमीन शेख, कार्याध्यक्ष अरुण कदम, संघटक अमोल गायकवाड, सरचिटणीस शिवाजी गायकवाड, सहसरचिटणीस प्रविण आभाळे, खजिनदार संजय भवर, प्रसिद्धी प्रमुख भागिनाथ गायकवाड, तालुका सल्लागार साहेबराव दवंगे, ज्ञानेश्वर भुसे, संजय साबळे, दिनेश जोशी, तालुका कार्यकारणी सदस्य विष्णुपंत सुंबे, सागर पवार, सदस्य काकासाहेब खर्डे, मधुसूदन ओझा, गोरक्षनाथ वर्पे, राहुल आभाळे, गणपत देवकर, गणेश देवकर, ऋषिकेश कासार, श्रीकांत नरोडे, दत्तात्रय गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस रोहित टेके यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष अमोल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली व सरचिटणीस रोहित टेके यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, उत्तर जिल्हा सरचिटणीस रोहित टेके यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!