लोणी दि.१५( प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिचोली ता.सिन्नर येथील सरविश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालय, येथील प्राचार्य डॉ. जी बी शिंदे यांची केमिकल व पेट्रोल केमिकल विभागाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर भर देत शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि विद्यार्थी प्रिय म्हणून प्राचार्य जी.बी. शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील ,खासदार सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे यांनी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले .



