5.4 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

खा. नीलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक  खासदार झाल्यानंतर खा. लंके प्रथमच विधानभवनात  खा. शरद पवार यांचीही घेतली भेट 

नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवून विजय संपादन केलेल्या खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी विधानभवनात जाऊन ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. दरम्यान, मुंबई दौऱ्यादरम्यान खा. लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा. लंके म्हणाले, सन २०१९ मध्ये विधानसभेचा सदस्य म्हणून मी प्रथम विधानभवनामध्ये पहिले पाऊल टाकले. गेल्या साडेचार वर्षात या विधानभवनामध्ये अतिशय चांगले अनुभव आले. समाजाची सेवा करण्याची संधी मला माझ्या मायबाप जनतेने दिली. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मी याच विधानभवनामध्ये निश्‍चितपणे केला. साडेचार वर्षात समाधानकारक काम केल्यानंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढविली, खासदार होउन पहिल्यांदाच विधानभवनात आलो. याच पवित्र मंदीराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर ताकद दिली, पेरणा दिली त्यामुळे मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याची प्रतिक्रीया खा. लंके यांनी दिली.

खा. लंके यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगेश मते, भुषण शेलार, दादा दळवी आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!