spot_img
spot_img

प्रवरा च्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षण

लोणी दि.१५ (प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यासक्रमासोबतचत्यांच्यातील कौशल्याचा विकास व्हावा याकरिता लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलने ‘रुबीकॉन’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना सादरीकरण कौशल्य, आत्मविश्वासाने संभाषण कौशल्य, व इतर सॉफ्ट स्किल्स चे प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांकरिता या प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून अनेक कौशल्य आधारीत उपक्रम राबविण्यात आले. या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभा प्रसंगी या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या ॲग्री, बायोटेक, आणि ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा त्यांच्या कारकीर्दीसाठी निश्चित लाभ होईल अशा प्रतिक्रिया दिल्या. 

कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे यांनी मनोगत व्यक्त करताना “स्पर्धांना सामोरे जायचे असेल तर विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि त्याकरता कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ किरण गोंटे, बायोटेक चे प्राचार्य विशाल केदारी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ.अनिल बेंद्रे, प्लेसमेंट समन्वयक भाऊसाहेब घोरपडे, प्रा सुदाम वर्पे, प्रा धीरज कार्ले तसेच कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भाऊसाहेब घोरपडे यांनी केले 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बायोटेकच्या विद्यार्थिनी अदिती कोरडे व ज्ञानदा मानेराव यांनी केले तर आभार डॉ अनिल बेंद्रे यांनी मानले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!