राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील महत्वपूर्ण पाच रस्त्यांकरीता तसेच सहा गावातील तलाठी, मंडल कार्यालया करीता पालकमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून १६ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. यासाठी या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यापैकी एकूण पाच रस्त्यांना १५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाना गती मिळेल.
राहाता शिर्डी बाह्यवळण रस्ता राज्य मार्ग ६७ करीता १कोटी ९० लाख,संगमनेर कोल्हेवाडी मनोली मार्गाकरीता ८०लाख, दाढ बुद्रूक हसनापूर लोणी गोगलगाव नांदुर्खी निमगाव कोर्हाळे रस्त्याकरीता १कोटी २० लाख,सावळीविहीर ते रांजणगाव देशमुख रस्त्याकरीता ३कोटी १०लाख ,सावळीविहीर रांजणगाव देशमुख काकडी केलवड बाह्यवळण रस्त्याकरीता ८लाख इतका निधी उपलब्ध झाल्याने यासर्व ग्रामीण भागातील रस्ते आता मुख्य मार्गाना जोडण्यास मोठी मदत होणार आहे.ग्रामीण भागातून येणारे शेतकरी महाविद्यालयीन विद्यार्थी नागरीक यांच्या करीता हे मार्ग आता महत्वपूर्ण ठरतील
तालुक्यातील पिंपळस पिंपळवाडी डोर्हाळे ममदापूर अस्तगाव गोगलगाव करीता मंत्री विखे पाटील यांनी तलाठी मंडल कार्यालया करीता १कोटी १३लाख रुपयंनाही मंजूरी मिळाल्याने या गावातील तलाठी कार्यालय लवकरच निर्माण होतील.
यापूर्वीही तालुक्यातील विविध विकास कामांकरीता मंत्री विखे पाटील यांनी भरघोस निधीची उपलब्धता करुन दिली आहे. व्यक्तिगत लाभाचा पाठपुरावा देखील सातत्याने होत असल्याने लाभार्थ्यांना या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. रस्यांत्च्या तसेच तलाठी कार्यालया करीता एकूण १६कोटी रुपयांचा निधी उलपब्ध करुन दिल्याबद्दल संबंधित ग्रामस्थांनी विखे पाटील यांचे आभार मानले आहे.