कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा ):-तालुक्यातील वारी साखरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्यातून चिकू प्रजातीच्या दहा वृक्षांची गुरुवारी (दि.11) लागवड करण्यात आली.
याप्रसंगी वृक्षलागवड कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पोर्णिमा गोर्डे यांनी केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य पालक, विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेच्या क्रीडांगणात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके म्हणाले, सध्या सर्वत्र सिमेंटचे जंगल वाढले असून झाडांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता दिवसागणिक अधिकाधिक वाढत आहे. पुढच्या पिढीसाठी ही बाब हानिकारक आहे. त्यावर पर्याय म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरीता वृक्षलागवडीसाठी आजच सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. याच भावनेतून दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ ट्रस्टच्या माध्यमातून शाळेत चिकू या प्रजातीच्या दहा झाडांची लागवड केली आहे. या माध्यमातून भविष्यात झाडांच्या सावलीसह विद्यार्थ्यांना हक्काची फळं खावयास मिळणार आहे. त्याचबरोबर या झाडांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी खारीच्या वाट्या इतके योगदानही असणार आहे.
यावेळी बापूराव बहिरमल, संतोष भाटे, योगेश शिंदे, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली निकम, उपाध्यक्ष अंबादास गिरी, भाऊसाहेब वरकड, सुरज टेके, महेंद्र महाले, भीमराव लांडगे, ज्ञानेश्वर बनकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा गजभिव, वृषाली टेके, वज्रेश्वरी देसले, कल्पना निळे, रोहिणी कडू, ताराबाई गायकवाड, शोभा त्रिभुवन, संगीता भालेराव, सविता शिंदे, नरसिंग शेख, करिष्मा तानसरे, सुमन मोरे, रूपाली टोपले, प्रवीण आहेर, निवृत्ती गोडे, परसराम टोपले, मंगल कहार, अमृता काजळे, शंभूराजे गोर्डे उपस्थित होते.



                                    