spot_img
spot_img

साईबाबा मंदिराच्या शेजारील परिसरात पादत्राणेला बंदी

शिर्डी ( प्रतिनिधी ):-  श्री साईबाबा संस्थान ने संस्थानाच्या  सेवेतील प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, विभाग प्रमुख व कर्मचारी यांच्यासह साई भक्त व ग्रामस्थांना मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्या वेळी पादत्राणे घालून जाण्यास सक्त मनाई अथवा बंदी करण्यात आली आहे.

यापुढे साईबाबा मंदिरात प्रवेश करण्याआधी पादत्राणीगृहात चप्पल अथवा बुटे ठेवल्यानंतरच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.

 याबाबत संस्थांचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी सिवा शंकर यांनी शुक्रवारी 12 मे रोजी परिपत्रक जारी केले आहे. तसेच हे परिपत्रक संबंधित विभागांना आदेशाची लगेच अंमलबजावणी करण्यात सूचित केले आहे. शंकर यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की साईबाबा संस्थानच्या सर्व प्रशासकीय अधिकारी,अधीक्षक, विभागप्रमुख कर्मचारी यांनी श्री चे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करताना आपले पादत्राणे प्रत्येक प्रवेश गृह बाहेरील पादत्राणेगृह येथे आपली चप्पल व बूट ठेवून मग  प्रवेश करावे.
 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!