spot_img
spot_img

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांवर नियुक्ती

लोणी दि.१३ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागाच्या डॉ. भाऊसाहेब पांगारकर यांची केमिकल व पेट्रोकेमिकल इंजिनीरिंग तर कॉम्पुटर इंजिनीरिंग विभागाच्या डॉ. वैशाली मांढरे/विखे यांची कॉम्पुटर इंजिनीरिंग विभागाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांवर निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
    

महाविद्यालयामध्ये अतिशय तळमळीने शिकविणारे आणि नेहमीच विद्यार्थी केंद्रबिंदु माणून सतत कार्यरत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. विद्यार्थ्यांना नेहमीच नवनवीन काहीतरी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले.नुकतेच केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले असून ते यशस्वीपणे राबविण्यासाठी या शिक्षकांच्या ज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील., सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!