एस एस सी बोर्डाची सलग 17 वर्ष शंभर टक्के निकाला बरोबरच गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवली आहे. इयत्ता दहावीची सीबीएससी बोर्ड सलग्निक पहिलीच बॅच यावर्षी बाहेर पडली. उत्कृष्ट अध्यापक वर्ग ,अभ्यास पूरक वातावरण,सहकार्य करणारे पालक, चांगली मार्गदर्शक स्थानिक स्कूल कमिटी आणि अनुभवी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था पाठीमागे असल्याने उत्कृष्ट निकाल देता आला असल्याचे माहीती विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रवरा हायस्कूल ने सीबीएसई बोर्ड चा अभ्यासक्रम स्वीकारला आणि भविष्यातील येणाऱ्या आव्हानांसाठी परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे शिक्षण देण्याचे ध्येय समोर ठेवले .विद्यार्थी आणि शिक्षकांनी अपार मेहनत घेऊन गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.
कोल्हारच्या प्रवरा हायस्कूल सीबीएसई शाळेचा शंभर टक्के निकाल पहील्या बॅचचा निकाल शंभर टक्के
लोणी दि.१२ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएससी बोर्डाच्या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. प्रवरा हायस्कूलने एसएससी बोर्ड मधून सीबीएससी बोर्ड मध्ये चार वर्षांपूर्वी संलग्नता मिळवली होती.
एकूण विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत . कुमारी आरुषी आनंद खर्डे ने 95 टक्के गुण मिळवून विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर सोहम सुनील शिंदे या विद्यार्थ्यांनी 94.40 टक्के मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक प्रणव भिकाजी राऊत 93.40% आणि कृष्णा प्रमोद काळे 93.40% यांनी पटकावला . चतुर्थ स्थानी हर्षल अमोल खर्डे 90.40 गुण मिळविले आहे. विद्यालयाची सीबीएसई बोर्ड परीक्षेची ही पहिलीच बॅच होती .विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक गुणवत्ता पूर्ण निकाल देऊन विद्यालयाची मान उंचावली आहे.
विद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील ,खा. सुजय विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील ,विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पाटील, संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या उत्कृष्ट निकालासाठी वर्गशिक्षक श्री एस.जी. आहेर श्री जी.व्हीं. तांबे श्री ए डी म्हस्के ,श्री पी.जे.काळे, श्री एस बी आव्हाड यांनी परिश्रम घेतले.



