8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

नेतृृृत्व गुण असले तर विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न होत असतो – डाॅ.राजवीर भालवार

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेतृृृत्व गुण असले तर विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न होत असतो.प्रवरेतून शिक्षणासोबत इतरही शालेय उपक्रमातून आदर्श विद्यार्थी घडत असतो.अभ्यासाबरोबरचं शालेय जीवनाचे अनुभव घेत मुलांनी पुढे जावे असे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील रूरल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य एअर व्हाइस मार्शल डॉ.राजवीर भालवार यांनी केले.

प्रवरा सेट्रल पब्लीक स्कुल प्रवरानगरच्या१३ वा वि‌द्यार्थी प्रतिनिधी समारोह डाॅ.भालवार बोलत होते. डाॅ.भालवार म्हणाले “मला मनस्वी आनंद होत आहे.” “वि‌द्यार्थी दशेत आपणास प्रतिनिधी होण्याचे भाग्य लाभले ही एक अभिमानाची गोष्ट आहे ते या साठी की ९०० वि‌द्यार्थाचे तुम्ही प्रतिनिधीत्व करणार आहात. आपल्या सर्वांची निवड करताना शैक्षणिक, क्रीडा, सांकृतिक, शिस्त, इतर कला कौशल्याचा विचार करण्यात आलेला आहे. हे प्रतिनिधीत्व करत असताना तुमच्या मध्ये नेतृत्व गुण विकसित होणार आहे .आज समाजामध्ये चांगल्या शिस्तप्रिय, अभ्यासु नेतृत्वाची गरज आहे. जेव्हा आपण आपले शिक्षण पूर्ण करून जेथे नोकरी, व्यवसाय करणार आहात त्या वेळेला शालेय जीवनात वि‌द्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्य केल्याचा नक्कीच फायदा होईल. आपण सर्वानी प्रवरा सेन्ट्रल पब्लिक स्कूलचे नाव लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. आपण वि‌द्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी या मधिल दुवा म्हणून काम करा असा संदेश दिला.

यावेळी क्रीडा प्रतिनिधी, सांकृतिक प्रतिनिधी, वस्तीगृह प्रतिनिधी या निवडी करुन त्यांना बॅच वितरण करण्यात आले. काार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय आहेर यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!