कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :-कोपरगावमध्ये एका २८ वर्षीय तरूणाची हत्या झाल्याची घटना समोर आलीय. या तरूणाची अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचं वातावरण असल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर तीनजण फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. सोहेल हारून पटेल (२८ वर्षीय), असं निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन आरोपी ताब्यात तर तिघेजण फरार आहेत. मृत तरूणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडलेला आहे.
आरोपींना मृत तरूणावर अनैतिक संबंधाचा संशय होता. त्यामुळे त्यांनी सोहेल पटेलचं काल २१ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर आरोपींनी सोहेलला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये सोहेलचा मृत्यू झालाय. मृताच्या नातेवाईकांनी हत्येनंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरचं ठाण माडलं आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केलीय. या घटनेमुळे कोपरगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.