5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

महिलांनी फुलशेतीतून रोजगार निर्मितीसाठी पुढे यावे- सौ.विखे पाटील

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-महिलांच्या सक्षमीकरणासाठी जनसेवा फाउंडेशनच्या योजना आहेत. यामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा आज टाकाऊ पासून टिकाऊ तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुकलेल्या फुलांपासून बनवलेल्या वस्तूंना मोठी बाजारपेठ सध्या उपलब्ध आहे. प्रशिक्षणातून उत्पादित वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.

बाभळेश्वर (ता राहाता) येथे सी.एस.आय.आर आणि राष्ट्रीय वनस्पती अनु संधान संस्था,लखनौ फ्लोरिकल्चर मिशन, अंतर्गत जनसेवा फौंडेशन लोणी आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने सुकलेल्या फुलांपासून विविध कलाकृृती आणि ग्रिटींग कार्ड आणि ज्वेलरी मेकिंग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन सौ. विखे पाटील बोलत होत्या.यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनही करण्यात आले.

याप्रसंगी फ्लोरिकल्चर मिशनचे वरिष्ठ शास्ञज्ञ डॉ विजय वाघ ,डाॅ.श्वेता सिंग,प्रवरा भाजी पाला सोसायटीच्या अध्यक्षा सौ गीता ताई थेटे,भाजपा महिला तालुका अध्यक्षा सौ. शोभा घोरपडे, उपाध्यक्षा सुवर्णा मोकाशी,माजी सभापती बबलू म्हस्के, अमृत मोकाशी,शंकर बेंद्रे,प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे, प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख, यांच्या सह सर्व बचत गटातील महिला ,शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी सौ. विखे पाटील म्हणाल्या, आज लाईट वेट ज्वेलरीला मोठी मागणी आहे फुलांपासून आकर्षक वस्तूंबरोबरच ज्वेलरी तयार करण्याचे हे प्रशिक्षण महिलांना महत्त्वपूर्ण ठरणार असून याविषयी सविस्तर प्रशिक्षणासाठीही महिलांना जनसेवा फाउंडेशन मार्फत मदत केली जाईल. महिलांनो तुम्ही उत्पादन घ्या प्रशिक्षण आणि बाजारपेठेसाठी आम्ही आपल्या सोबत आहोत असा आत्मविश्वास महिलांना सौ. विखे पाटील यांनी दिला.

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचे केवळ बचत गटाबरोबरचं त्यांना सक्षमपणे उभं करण्याचं काम महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेत महिलांच्या माध्यमातून मोठे संघटन जिल्ह्यामध्ये आहे. या माध्यमातून महिला या रोजगारभिमुख होत आहेत याचाही अभिमान मोठा आहे. या प्रशिक्षणातून महिलांनी टाकाऊ पासून टिकाऊ तंत्रज्ञान समजून घेत स्वयंपूर्ण व्हावे असेही सौ विखे पाटील यांनी सांगितले.

डॉ. वाघ यांनी फ्लोरिकल्चर मिशन विषयी माहिती देताना २३ राज्यात हे काम उत्कृष्टपणे सुरू आहे. फुल शेतीला मोठी संधी आहे यापासून महिलांनी रोजगार निर्मिती सुरू करावी आज सुकलेल्या फुलांपासून आकर्षक वेगवेगळ्या वस्तूं बरोबरच आकर्षक अशा ज्वेलरी तयार केली जाते प्रशिक्षणाबरोबरच बाजारपेठही उपलब्ध करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. याचा लाभ महिलांनी घेऊन पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून फुल शेतीला या भागांमध्ये मोठी चालना दिली जात आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणामध्ये प्रवरा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थीसह आणि परिसरातील महिलांनी मोठा सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केंद्राच्या विस्तार विभाग प्रमुख प्रियंका खर्डे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!