संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-शासकीय योजनेतून महायुती सरकार हे सर्वांना आधार देत आहे. परंतु महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसह अनेक योजनाबाबत विषयी चुकीची माहिती देवून दिशाभूल करीत आहेत. एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे फॉर्म भरायचे यामध्ये खरंच आपण अर्ज भरण्यासाठी धावपळ करायची.मात्र महाविकास आघाडीकडून अर्ज बरोबर भरला जातोय का याविषयी देखील शंका व्यक्त होत आहेत.त्यामुळेच आपला फॉर्म विश्वासू यंत्रणेकडे भरा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनी विखे पाटील यांनी केले.
महसुल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्ननातून कोल्हेवाडी येथे महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण कारी योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना साहीत्याचे वाटप सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी सरपंच सुवर्णा दिघे ,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका अलकाताई दिघे, दादा पाटील गुंजाळ,जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अमोल दिघे, राहुल दिघे,पोपटराव कोल्हे,ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे सर्व सदस्य ,लाभार्थी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ विखे पाटील म्हणाल्या, विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम एकत्रितपणे कार्यकर्त्यांनी करत आहेत. अनेक योजना महायुती आणि केंद्र सरकारच्या आहेत त्या योजना घराघरात पर्यंत पोहोचवत असताना या योजना नेमकं कुणासाठी आणि कोणी सुरू केल्या हे स्पष्टपणे जनतेला सांगताना शिर्डी मतदारसंघात आणि जिल्ह्यांमध्ये महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक योजना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जातात या योजनेचा प्रत्येकाने लाभ घेऊन पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आपल्याकडे काही नेते जाणून बोजून विकास कामांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी कितीही खो घातला तरी विकास कामे हे थांबणार नाहीत गैरसमज निर्माण केला असला तरी या माध्यमातून आपण नेमकं काय साध्य करणार आहात हा विचार त्यांनी करावा आणि विश्वासू लोकांकडूनच महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म महिलांनी भरावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या लाभा विषय देखील त्यांनी सविस्तर माहिती उपस्थित दिली.