श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):-तालुक्यातील बेलापूर ररत्यावरील असलेल्या श्री साईबाबा मंदिर तसेच हनुमान मंदिरात चोरट्यानी धाडसी करून दानपेटी घेवून ऐवज लंपास केल्याची गुरुवारी मध्यरात्री दरम्यान घटना घडली.श्रीरामपूर – बेलापूर ररत्यावरील श्री साईबाबा मंदिर तसेच हनुमान मंदिर येथे चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे पुन्हा चोरट्यांनी मोर्चा पोलीस चौकीच्या जवळ बस स्टॅड समोर प्रवाशी वाहतूकीसाठी लावण्यात आलेल्या उभ्या रिक्षावर डल्ला मारला.यामध्ये नऊ रिक्षा व रामगड येथे दोन रिक्षा अशा एकूण अकरा रिक्षामधील बॅटऱ्या व एका रसवंतीमधील ईन्व्हटरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.
याबाबत घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.चोरट्यांनी श्री साईबाबा मंदिरामध्ये समोरून प्रवेश केला मंदिराला लावलेले कुलूप तोडून मंदिरातील साईबाबांच्या चांदीच्या पादुका व दानपेटी घेवून चोरटे फरार झाले.मंदिराच्या काही अंतरावर चोरटयानी दानपेटी फोडून यातील ऐवज लंपास केला.तसेच दानपेटी ठिकाणावरच सोडून फरार झाले.
गावामधील एस टी बस स्टॅड समोर नंबरसाठी लावण्यात आलेल्या नऊ रिक्षा व रामगड येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षामधील अकरा रिक्षाच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. त्याबरोबर चोरटे जाताना रामगडजवळील असणाऱ्या हनुमान मंदिरातही उचकापाचक केली.तेथे दानपेटीत काही ऐवज मिळाले नसल्याने त्यांनी दानपेटी तशीच ठेवली.परंतू मंदिरात असलेले छोटे कपाटाचे कुलुप तोडून उचकापाचक केली.तेथे काही मिळून आलेले नाही.त्याच ररत्यावरील एका रसवंतीगृहतील ईन्व्हटर व बॅटरी घेवून चोरटे पसार झाले होते.अनेक ठिकाणीच्या भुरट्या चोऱ्या करून चोरट्यांनी बेलापूर पोलिसांना आवाहन दिले
आहेत.मागील काही दिवसापूर्वीच रामगड येथे ओहोळ यांच्या घरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम घेवून चोरट्यांनी पोबारा केला.अजून ही या घटनेचा तपास लागलेला नसताना अश्या घटना समोर आल्या.या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ खबर देण्यासाठी बेलापूर पोलीस चौकीला गेले होते.
मात्र त्यावेळीला अनेकवेळा आवाज देवूनही पोलीस चौकीला ड्युटीवरील कर्मचारी झोपेतून उठला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.सध्या गावातील रात्रीची गस्तही बंद झालेली आहे.अनेक ठिकाणी आडवी तिडवी वाहने उभी असतात.रहदारीला अडथळा निर्माण होतो.परंतु रात्रीही अन् दिवसाही पोलीस गावात फिरकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.शनिवारी तर झेंडा चौकात प्रचंड गर्दी होते. तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नसल्याने लोकही तक्रार करण्यास पोलीस स्टेशनला जात नाही. बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा परिसर येतो. त्यामुळे येथे कार्यक्षम पोलिसांची नियुक्ती करावी. मागणी केली.अशा परिसरात वारंवार होणाऱ्या घटनेने पोलिसांचा वचक संपला तर ना? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
यापूर्वी २०१६ -१७ मध्ये मदिरांची स्थापना झाल्यानंतर दानपेटी चोरी झाली होती.मात्र त्यावेळी दानपेटी चोरट्याना फोडता आलेली नव्हती.त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी दानपेट्या व चांदीच्या पादूका चोरून नेल्या.
पोलीस प्रशासनाचे इतर मात्र धंद्याकडे लक्ष -बेलापूर गावात गुटखा दारु मटका ऑनलाईन गेम इतर गोष्टीकडे पोलिस प्रशासन चांगले लक्ष देतात.