लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-बौध्दीक क्षमता कमी असली तरी , विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असतात या स्पर्धेमुळे हे विद्यार्थी कुठेही कमी नाहीत. दिव्यांग मुलांच्या भावना समजून घेवून त्यांच्या जीवनात रंग भरण्याचे काम करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
पद्यश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी येथे समाज कल्याण विभाग अहमदनगर समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहमदनगर आणि स्पेशल ऑलिंपिक भारत महाराष्ट्र अहमदनगर आणि पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन विळद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बौध्दीक अक्षमता विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय कला आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी जिल्हा समग्र शिक्षण विभागाच्या समन्वयक श्रद्धा मोरे, राहाता विभागाच्या सविता कवडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, संस्थेचे शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे,कॅम्प संचालक डाॅ.आर.ए.पवार, विखे पाटील फाउंडेशन चे समन्वय डाॅ. किरण आहेर संस्थेचे क्रीडा संचालक डाॅ. प्रमोद विखे आदींसह जिल्हाभरातून आलेले शिक्षक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या आज या उपक्रमातून या विद्यार्थ्यांना मोठा आनंद मिळत आहे. दैवाने त्यांना काही गोष्टी कमी दिल्या असल्या तरी त्यांच्यामध्ये खूप कला गुण आहेत या मुलांसोबत विखे पाटील परिवार कायम आहे. आपल्या आनंदाचा क्षण या मुलांबरोबर साजरा करा असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी स्पेशल ऑलिंपिक भारत महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांनी स्पर्धेचा शुभारंभ करत यि विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम हे सुरू आहेत या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना मोठे व्यासपीठ मिळत आहे.पद्यश्री डाॅ. विखे पाटील फौडेडेशन विळद घाट यांच्यावतीने या दिव्यांग शाळातील विद्यार्थ्यांसाठी यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला अशा विविध स्पर्धा विविध गटातून घेण्यात येत असून यातून विद्यार्थी हे ऑलिम्यिकमध्ये यशस्वी होण्याठी प्रयत्न होणार असल्याचे सांगितले.यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचा गौरव ही सौ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचेप्रास्ताविक डाॅ.प्रदिप दिघे यांनी तर आभार सविता कवडे यांनी मानले.
विखे पाटील परिवार आजपर्यंत दिव्यांग बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी होणारे विविध उपक्रम या माध्यमातून आमचा आम्ही दिव्यांग नाही याची जाणीव होते.यामुळे आम्हाला आमच्या मुलाचा मोठा अभिमान वाटतो असे पालक वनिता जंगम यांनी सांगितले.